बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीयधक्का बसला आहे. चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. बोंद्रे यांनी व्हिडिओ पोस्ट करत भाजप प्रवेशाची माहिती दिली... आपल्या जुन्या सहकाऱ्यांचे आभारही मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बोंद्रे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रभाव असलेल्या बुलढाण्यात बोंद्रे यांच्या निर्णयामुळे राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Buldhana | Major setback for Congress in Buldhana; former MLA Rahul Bondre to join BJP.