सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या नव्या निर्णयानुसार एका वर्षात सीबीएसईकडून दोनवेळा परीक्षा घेतली जाणार आहे. सीबीएसईनं दोन वेळा परीक्षा घेण्याच्या प्रणालीला मंजुरी दिली आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारी आणि दुसरी परीक्षा मे महिन्यात घेतली केली जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील पहिली परीक्षा देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दुसऱ्या परीक्षेतील सहभाग ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. पहिल्या परीक्षेत ज्यांना गुण कमी मिळालेत ते दुसरी परीक्षा देऊन गुण वाढवू शकतात. मात्र, नव्या नियमांनुसार अंतर्गत मूल्यमान वर्षातून एकदा आयोजित केली जाणार आहे.