Chandrapur Rain| मूल MIDC परिसरात मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता

चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, विजांच्या गडगडाटामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हवामान विभागाने पुढील काही दिवसही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगितले असून नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे तसेच विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Chandrapur Rain | Heavy rain in the Mul MIDC area; strong rainfall likely over the next five days.

संबंधित व्हिडीओ