LPG गॅसचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांमुळे रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी गॅस कार्यालयांबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.मात्र, जिल्ह्यात LPG गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलंय. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना केलंय