जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरणाच्या उजव्या कालव्याला असलेला धोका टळला आहे. दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे कालव्याच्या भिंतीवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. मात्र, पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने मन्याड धरण सुरक्षित झाले असून मोठा अनर्थ टळला आहे.