छत्रपती संभाजीनगरात, ज्याला मित्र मानले, त्याच रील स्टारने ५० लाख रुपयांच्या वादातून निवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या आणि त्यानंतर एका जंगलात मृतदेह पुरल्याची घटना समोर आली आहे. तर तब्बल 40 दिवसांनी प्रकरण उघडकीस आणून, पोलिसांनी पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढले. धक्कादायक म्हणजे मुख्य आरोपी असलेल्या न्या रिल्स स्टारने दीड महिन्यापूर्वीच हत्येचा कट रचला होता. राजाभाऊ सुभराव लोंढे असे निर्घृण हत्या करण्यात आलेल्या प्राध्यापकांचे नाव असून, विशाल राठोड असे मुख्य आरोपी रिल्स स्टारचे नाव आहे. तर हत्येसाठी त्याला मदत करणाऱ्या आकाश पवार, करणं आडे नाव असलेल्या त्याच्या साथीदारांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.