छगन भुजबळ यांनी मुंबई नाशिक महामार्गावरच्या परिस्थितीवरती नाराजी व्यक्त केली आहे. तर महामार्ग सुधारण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिलेली आहे. अन्यथा अधिकाऱ्यांवरती कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. दहा दिवसांमध्ये महामार्ग सुधारला नाही तर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. DCP ला पण लक्ष घालायला सांगितलं असं सगळ्यांना लक्ष घालून त्यामध्ये संपूर्ण त्यावर देखरेख ACS PWD म्हणजे मनीषा म्हैसकर त्यांनी त्या ठिकाणी करायचं आणि ह्याच्यामध्ये सुधारणा करायची आणि दहा दिवसात जर का बदल झाला नाही, तर त्यामध्ये पड रस्ते विकास महामंडळ, जे कोणी पोलीस त्याला जबाबदार असतील ते त्यांच्यातल्यांना काहींना suspend करायचा असा निर्णय झाला. drone एक ठेवायचं ठरलंय. ड्रोन नी सतत कुठल्या भागामध्ये ट्रफिक थांबतंय, कशामुळे थांबतंय ते देखरेख ड्रोन सतत करेल आणि तिन्ही शिफ्ट ला पोलीस आणि पोलिसांची टीम तिथे हजर असलीच पाहिजे.