Contractor of 'Jaljeevan Mission' commits suicide in Sangli due to financial distress; administration criticized सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील ३५ वर्षीय तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 'जलजीवन मिशन' या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील कामाचे सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांचे बिल सरकारकडून थकीत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कंत्राटदार संघटना आणि विरोधी पक्षांनी केला आहे.