पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेल्या तणावाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने गावात जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी यवत गावात दाखल झाले आहेत.