Vasai-Virar चे माजी आयुक्त अनिल पवारांचं 'कमिशन रेटकार्ड' ED च्या छाप्यात उघड

वसई-विरार महानगरपालिकेचे (VVMC) माजी आयुक्त अनिल पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate - ED) नुकत्याच केलेल्या छापेमारीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या छाप्यातून पवार यांचा कथित 'कमिशन रेटकार्ड' उघड झाल्याचा दावा ईडीच्या सूत्रांनी केला आहे. वसई-विरारमध्ये अनधिकृत बांधकामांना परवानग्या देण्यासाठी प्रति स्क्वेअर फूट किती 'कमिशन' घेतले जात होते, याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित व्हिडीओ