पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टवरून निर्माण झालेल्या तणावाची आग अजूनही पूर्णपणे विझलेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त कायम ठेवला आहे. 'यवत कुणी पेटवलं?' असा प्रश्न आता स्थानिकांसह सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. NDTV मराठीने तणावग्रस्त यवत गावात जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.