पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गाव सध्या तणावाखाली आहे. सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटांमध्ये जोरदार वाद निर्माण होऊन दगडफेक, जाळपोळ आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्याची माहिती समोर येत आहे.