आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं सांगत कोर्टाने ही बंदी कायम ठेवलीय. त्याचबरोबर एकसदस्यीय उच्च स्तरीय समिती नेमण्याचे आदेश ही देण्यात आलेअसून त्या समितीचा अहवाल बुधवारपर्यंत कोर्टानं मागवलाय. त्या समितीच्या अहवालाचा अभ्यास करून कोर्ट पुढील निकाल देईल, असं कोर्टाने स्पष्ट केलंय. मात्र तोपर्यंत कबुतरांना दाणे घालण्यावर बंदी कायमच असेल. त्यामुळे आता महापालिकेकडून पुढील कारवाई केली जाऊ शकते. पुन्हा एकदा दादर कबुतरखान्यावर ताडपत्री घातली जाईल