राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकार आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री कार्यालयाकडून गंभीर परिस्थिती असलेल्या भागांची माहिती मागवण्यात आली आहे. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांचा दौरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्यासाठी दुष्काळी दौरा जाहीर केला आहे. शिंदे अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यावर सरकारचा भर असणार आहे.