मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी 5 सप्टेंबर ऐवजी आता 8 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी आणि अनंत चतुर्दशीच्या सणादरम्यान शांतता राखता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ५ सप्टेंबरची सुट्टी कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सुरू असतील.