जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे चित्र आहे. भाजप 10, शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा, असा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलंय.. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही याच पद्धतीने जागावाटप होणार असून, एक-दोन जागा इकडे-तिकडे होऊ शकतात, असे स्पष्ट केले. तसेच एका जागेवर मतभेद असून ते उद्या सायंकाळपर्यंत मिटतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पाचोरा, भडगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या चार जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती.. उद्या सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये उद्या नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे