Nepal Flood| नेपाळच्या रसुवातून पूरग्रस्तांपर्यंत पोहोचतंय ताजं दळण, झऱ्यांवर चालते पारंपरिक चक्की

नेपाळमधील विनाशकारी पूर येऊन आठवडा उलटून गेला आहे.सध्या बचाव आणि शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र ज्या रसुवा जिल्ह्याला या पुराचा मोठा फटका बसला होता तिथूनच एक वेगळं चित्र समोर आलंय. ज्या पाण्यानं रसुवा जिल्ह्यात होत्याचं नव्हतं केलं त्याच पाण्याच्या जोरावर रसुवाच्या दुर्गम भागात चक्क गिरणी चालते. आणि ही पारंपरिक गिरणी गेले अनेक वर्षांपासून इथल्या नागरिकांच्या उपयोगी पडत आली आहे. रसुवाच्या शिखरबेशी इथं ही पारंपरिक चक्की चालते. मका, गव्हासारखी धान्य इथं या चक्कीवर दळून दिली जातात.आणि आता ही इथल्या चक्कीवर दळण दळून पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या जेवणाची ही सोय केली जातेय. पर्वतरांगांमधून खळाळून येणाऱ्या पाण्यावर ही चक्की चालते, हे विशेष....

संबंधित व्हिडीओ