Gadchiroli Rain| चामोर्शीत मुसळधार पाऊस, Yellow Alert ही जारी; रस्त्यांवर पाणी साचले | NDTV मराठी

गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील घोट आणि परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही काळ झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असली तरी दीर्घकाळ पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. Gadchiroli Rain | Heavy rainfall in Chamorshi; 'Yellow Alert' issued; waterlogging on roads.

संबंधित व्हिडीओ