Amravati च्या दर्यापुरात गॅस सिलिंडरची पळवापळवी, महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाईदरम्यान गोंधळ

अमरावतीच्या दर्यापुरात महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाईदरम्यान गोंधळ उडालाय. जप्त गॅस सिलेंडर जमावाने पळवून नेल्याची घटना घडलीय. अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींवरून महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केलीय. दर्यापूर शहरात हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. ही कारवाई सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. यावेळी जमावाने अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची माहिती मिळाली आहे.तसेच जप्त केलेले काही सिलेंडर सरकारी वाहनातून काढून पळ काढलाय..

संबंधित व्हिडीओ