Global Report| महासत्तांसमोर RIC चं आव्हान उभं राहण्याची शक्यता, पाहूया काय घडतंय जागतिक पटलावर?

भारतीय परराष्ट्र धोरणाचा सध्या कसोटीचा काळ आहे. ट्रम्प यांनी भारताविरोधात टॅरिफ अस्त्र उगारलंय. त्यामुळे जिथं भारत आणि अमेरिकेनं 500 अब्ज डॉलरचं द्वीपक्षीय व्यापाराचं लक्ष्य ठेवलं होतं, त्यालाच आता धक्का बसताना दिसतो आहे. अमेरिकेसह भारताच्या व्यापार वाटाघाटीही धोक्यात आल्याची चिन्हं आहेत. अशात भारताच्या मागे पुन्हा ठामपणे उभा आहे तो भारताचा जुना मित्र रशिया... भारतानं आपली टॅरिफबाबतची भूमिका स्पष्ट केली तेव्हा रशियानंही भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. आता तर रशियन अध्यक्ष पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट अखेरीस चीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक पटलावर महासत्तांसमोर आरआयसीचं आव्हान उभं राहण्याची शक्यता निर्माण झालीय. पाहूया काय घडतंय. जागतिक पटलावर...

संबंधित व्हिडीओ