अखेर पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये पंतप्रधान बदलला गेला आहे. ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. पक्षातील वाढत्या दबावानंतर त्यांना राजीनाम्याचा निर्णय घ्यावाच लागला. गेल्या १० वर्षांमध्ये ब्रिटनमध्ये सातवा पंतप्रधान येणार आहे. स्टार्मर हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण न करणारे सहावे पंतप्रधान ठरलेत. त्यांच्या जागी नुकतीच एक पोटनिवडणूक जिंकून संसदेत पुनरागमन करणारे अँडी बर्नहॅम हे नियुक्त होऊ शकतात. पाहूया ब्रिटनच्या राजकारणात नेमकं काय चाललं आहे. गेली १० वर्ष ब्रिटनला एक स्थिर पंतप्रधान का मिळू शकला नाही ते.