संजय राऊतांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही ज्या ओमराजे निंबाळकरांचं नाव घेताय ते एक नामचिन गद्दार आहेत, त्यांच्यासोबतचे जे इतर गद्दार आहेत, ते देखील नामचिन गद्दार असल्याचं म्हणत संजय राऊतांनी ओमराजेंवर जोरदार टीका केलीय, राऊतांच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय... आपण ओमराजेंच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.