नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जळगावच्या राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी, आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नसती तर विजय आपलाच झाला असता, असा दावा केलाय. जळगावमध्ये महायुतीचा धर्म पाळला गेला, मात्र नाशिकमध्ये तसे झाले नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. तसेच या संपूर्ण घडामोडींबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे संकेत रेश्मा काळे यांनी दिले आहेत. याबाबत रेश्मा काळे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..