विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला 'शून्य' मते मिळून पक्षाची राज्यभरात नाचक्की झाली असताना, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे अमरावतीत आश्चर्य व्यक्त होत आहे. "पैसा आणि सत्तेचा हा गोंधळ जास्त दिवस टिकणार नाही, लोकांना हे आवडत नाही, १४-१५ वर्षे झाली तुम्हाला लोक चोरावे लागत आहेत," अशी बोचरी टीका त्यांनी महायुतीवर केली. मात्र, स्वतःच्याच जिल्ह्यात काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणात फुटली आणि पक्षाचा ऐतिहासिक सुपडा साफ झाला, यावर यशोमती ठाकूर यांनी चकार शब्दही काढला नाहीय. त्यामुळे बंडखोरीवर गप्प राहत केवळ विरोधकांना लक्ष्य केल्याने अमरावतीत उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात