जुन्या मराठी चित्रपटामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातल्या राजकारणाचं चित्र रंगवलं जायचं. त्यात प्रत्येक गावात एक नतद्रष्ट पुढारी असायचा. जगातले सगळे वाईट गुण त्याच्या अंगी.... पण तरीही गावात त्याचाच शब्द ऐकला जायचा, असं साधारणपणे चित्रपटात दिसायचं. हा संदर्भ देण्याचं कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्डड ट्रम्प.. ते ही अशाच फिल्मी गावातल्या नतद्रष्ट पुढाऱ्या सारखे... आपण जगातले सगळे नियम मोडायचे मात्र तेच नियम इतरांनी मोडले तर त्यांचा इगो दुखावणार... याच दुखण्यातून गेल्या पाच दिवासांत त्यांनी भारतावर वारंवार टीका केली, भारतावर आणखी कर वाढवण्याची धमकी ते गेले दोन दिवस देत आहे. अर्थात भारतानंही त्यांना तिखट उत्तरच दिलंय. सुरुवातीला चीनशी व्यापार युद्ध छेडण्याचा त्यांनी प्रयत्न केला...पण तिथे डाळ शिजत नाही म्हटल्यावर ते भारताकडे वळलेत का असा प्रश्न निर्माण होतोय. याच पार्श्वभूमीवर पाहुयात हा खास रिपोर्ट