जुलै महिन्यात सर्वत्र पुराचा हाहाकार पाहायला मिळाल्यानंतर ऑगस्टमध्येही पावसासह वादळांची मालिका सुरुच आहे. शिवाय अनेक ठिकाणी तीव्र हवामान बदलही दिसताहेत. इटलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे दोन जलस्तंभ उभे राहिले. तर चीन, हाँगकाँगमध्ये वादळी वाऱ्यानंतर मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झालीय. इंडोनेशियामध्येही पुरानं एकच हाहाकार उडवून दिलाय. तर स्कॉटलंडलाही वादळी वाऱ्यानं जोरदार तडाखा दिलाय. युरोपमधील कोसोवोला ही पुरानं झोडपून काढलंय. दुसरीकडे अमेरिकेत कोरड्या हवामानामुळे वणव्यांचं सत्र सुरूच आहे, कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा एकदा आग भडकली आहे. तर जगाच्या दुसऱ्या टोकावर अर्थात ऑस्ट्रेलियामध्ये कैक वर्षांनंतर बर्फवृष्टी झालीय. पाहूया एक रिपोर्ट....