गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्याने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.