GST Impact on Sin Goods: जीएसटी परिषदेने 'सिन गुड्स' (Sin Goods) म्हणजेच सिगारेट, दारू, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर हानिकारक उत्पादनांवर 40% चा नवा कर जाहीर केला आहे. या निर्णयामुळे आता अनेक वस्तू महागणार आहेत. 22 सप्टेंबर 2025 पासून हा नवा नियम लागू होणार आहे. कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सवरील कर 28% वरून 40% पर्यंत वाढवण्यात आला आहे. याउलट फळांच्या रसावर आधारित पेये आणि सोया मिल्कवरचा कर 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे, त्यामुळे ती स्वस्त होणार आहेत. तर, मोठ्या इंजिनच्या लक्झरी गाड्यांनाही 40% जीएसटी लागू होणार आहे. सरकार या वाढीव महसुलाचा उपयोग आरोग्य आणि कल्याणकारी कार्यक्रमांसाठी करणार आहे.