पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय... नाशिककडून आलेला कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला गेला... अन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला.. या भीषण धडकेत ट्रक खाली कोसळला अन त्याखाली वेगन-आर कार दबली आहे... सुदैवाने या भीषण अपघात कोणतीही जीवितहानी झालेली आहे... खेड तालुक्यातील वाकी जवळ हा अपघात सकाळी सव्वा सहाच्या सुमारास झालाय... अपघातात कंटेनर पुणे लेनवर आल्याने, पुण्याकडे येणारी वाहतूक तासाभरापासून ठप्प आहे... नाशिककडे जाणारी वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे... महामार्ग पोलीस क्रेन घेऊन घटनास्थळी पोहचलेय... अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुयेत...