Mira-Bhayandar च्या खड्ड्यांवरुन महायुतीत जुंपली, खड्ड्यांवरुन BJP-Shivsena आमनेसामने

मिरा-भाईंदरच्या खड्ड्यांवरुन भाजप–शिवसेनामध्ये जुंपली भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका करत 11 ऑगस्टला रस्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.फाउंटन हॉटेल ते गायमुख हा रस्ता राज्य शासनाच्या अखत्यारीतील स्टेट हायवे आहे आणि त्याची जबाबदारी शासनानेच घ्यावी. महापालिकेच्या मर्यादित निधीतून या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणे योग्य नसल्याचे नरेंद्र मेहता म्हणालेत. दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ५०० कोटी रुपयांच्या कर्जाला शासनाची अंतिम मंजुरी मिळत नसल्याचा दावा करत मेहता यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे फाउंटन–गायमुख रस्त्याचा प्रश्न आता केवळ खड्ड्यांचा न राहता युतीतील राजकीय संघर्षाचा मुद्दा बनला आहे.

संबंधित व्हिडीओ