शहराचा सातबारा तुमच्या नावावर नव्हे, KDMC च्या नगरसेवकांना Eknath Shinde यांच्या कानपिचक्या

कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांना एकनाथ शिंदेंनी कानपिचक्या दिल्यात... लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, संधी दिली आहे, पण काही नगरसेवकांना आपण निवडून आलो की पूर्ण शहराचा सातबाराच आपल्या नावावर झाला, असे वाटू लागते. पण असं होता कामा नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीच्या नगरसेवकांना दिला.. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या ६० नगरसेवकांसाठीच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.

संबंधित व्हिडीओ