काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोग यांनी संगनमताने निवडणुकीत मतांची चोरी केल्याचा दावा केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे पुरावे सादर केले आहेत.