मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत.मनसे प्रमुख राज ठाकरेंनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढली होती. मात्र यात त्यांना खातंही उघडता आलं नाही.विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आजपासून पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत... दरम्यान महापालिका निवडणुकासाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागलेले आहेत.असं असताना नाशिक मनसेमध्ये सध्या नाराजीनाट्य सुरू आहे.स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त करत अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजपासून दोन दिवस अचानक नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीत कशी रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारय.