अमोल खुणेंच्या पत्राची आयकर विभागाकडून दखल, Manoj Jarange यांच्या सहकाऱ्यांची चौकशी होणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी आता थेट आयकर विभागाच्या दारात पोहोचली आहे... मनोज जरांगे यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी ईडी कार्यालयात तक्रार देत जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती... तर अजय बारस्कर यांनीही जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. या तक्रारीची दखल घेत आयकर विभागाकडून आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आयकर विभागाने सर्वप्रथम श्रीराम कुरणकर यांची चौकशी करावी, अशी मागणी अमोल खुणे यांनी केलीय. माझ्याविरोधातील तक्रारीला घाबरणार नाही, सत्य समोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा थेट इशाराच खुणे यांनी मनोज जरांगे यांना दिलाय.

संबंधित व्हिडीओ