चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा आज अखेर भाजपात पक्ष प्रवेश निश्चित झालाय. चंद्रपूर शहरातील एडी हॉटेल मध्ये हा सोहळा आज सकाळी अकराच्या सुमारास पार पडेल यावेळेस भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे देखील उपस्थित असतील. जोरगेवार आमच्या भाजप उमेदवारीला मुनगंटीवार यांनी जोरदार विरोध केला होता मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.