डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु भारताने ती नाकारली आहे. भारताने स्पष्ट केले की, कोणताही तिसरा देश काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करू शकत नाही आणि चर्चा फक्त पीओके परत करण्यावरच होईल. याबाबतचं वृत्त 'एएनआय'नं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. चर्चा फक्त 'पीओके'वरच होणार : भारतानं अमेरिकेला स्पष्ट केलं आहे की, पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर परत करण्याच्या आणि दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याच्या मुद्द्यावरच होईल. सरकारी सूत्रांनी सांगितलं की, काश्मीरबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, आता फक्त एकच मुद्दा उरला आहे - पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत करणे. याशिवाय बोलण्यासारखे काही नाही.