जळगाव शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आसोदा गावात अनेक भागांमध्ये 15 ते 20 दिवसांनी पाणीपुरवठा होतोय. भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना साठवून ठेवलेले पाणी हे पुरवावं लागतंय. त्यामुळे पाण्यात जंत होत असल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ ही ग्रामस्थांवर आली आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून गावातील काही भागांमध्ये ही पाण्याची समस्या गंभीर झालीय. याच पाण्याच्या समस्येमुळे गावातील मुलांना मुलीही देत नसल्याचा घटना समोर येतायत.गावातील अनेक सुना पाण्याच्या त्रासाला कंटाळून या शहराकडे गेल्याचा आरोप हा ग्रामस्थांकडून केला जात आहे.