KabutarKhana बंदच राहणार, मुंबई हायकोर्टानं ठणकावलं; कबुतरांना दाणे घालण्यावरुन जैन समाजातही फूट?

दादरमधल्या कबूतरखान्याचं काय होणार. तो पुन्हा सुरू होणार की बंदच राहणार.या प्रश्नाचं उत्तर आज हायकोर्टानं दिलंय.दादरमधला कबूतरखाना बंदच राहणार आहे.आणि कुणी पुन्हा कबूतरखाना उघडा असा राडा करायला आलंच, तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत.काही मोजक्या लोकांना कबूतरांना दाणे घालण्याची हौस आहे, त्यासाठी सगळ्यांचं आरोग्य धोक्यात कशासाठी घालायचं, असा सवालही कोर्टानं केलाय.तर कबूतरांना दाणे घालण्यावरुन आता जैन समाजातही फूट पडलीय.

संबंधित व्हिडीओ