कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाळीव कुत्र्याने चावा घेतलेल्या अडीच वर्षीय मुलाला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना सुईचा तुकडा मुलाच्या कमरेतच राहिल्याचे उघड झाले. एक्स-रेमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर शस्त्रक्रिया करून सुई काढण्यात आली. या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.