नवी मुंबईतील उलवे इथं एका कॅबचालकाची हातोड्याने घाव घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय.या प्रकरणी प्रेमीयुगुलावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.कॅबचालकाची हत्या केल्यानंतर त्याची कार घेऊन दोघेही पळून जात होते.प्रेमीयुगल अगोदर पुण्यात आणि तिथून नाशिकला गेले.नाशिकमध्ये त्यांच्या कारचा अपघात झाला आणि या अपघातामुळे हत्येचा उलगडा झाला.रिया आणि विशाल असे ह्या प्रेमीयुग्ल ची नावे आहेत.. त्यांच्याकडे कारची चौकशी केली असता कॅबचालक पांडेच्या हत्येची कबुलीच दोघांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.