दख्खनचा राजा जोतिबा डोंगरावर असणाऱ्या चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेत तब्बल 400 किलो वजनाचा भेसळयुक्त पेढा, बर्फी आणि हलवा जप्त करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जोतिबा डोंगरावर वारंवार भेसळयुक्त पेढे सापडत असल्याने भक्तांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं यावरून सिद्ध होत आहे.