मुंबईतील कुर्ला परिसरातून आरोग्य यंत्रणेला प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.बैलबाजार येथील डॉ. आनंदीबाई जोशी प्रसूतिगृहाशी संबंधित एका प्रकरणात प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून उचलून रुग्णालयात न्यावे लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.कुटुंबीयांच्या दाव्यानुसार महिलेची प्रसूती घरीच झाली होती. त्यानंतर तातडीने मदतीसाठी डॉक्टरांना संपर्क साधण्यात आला, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर उपचारासाठी महिलेला चादरीतून घेऊन रुग्णालयात न्यावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांनी मदतीसाठी जवळच्या पोलीस चौकीतही धाव घेतली, मात्र तेथेही आवश्यक सहकार्य मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Kurla News Allegation of being carried in a bedsheet after delivery; video from Anandibai Joshi Maternity Home goes viral.