भाविकांना विविध धार्मिक स्थळांचे दर्शन घेता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) लातूर विभागाने एक विशेष 'धार्मिक सहल योजना' सुरू केली आहे. ही योजना भाविकांसाठी एक पर्वणीच ठरत असून, आता त्यांना कमी खर्चात आणि सोयीस्करपणे राज्यातील प्रमुख देवस्थानांना भेट देता येणार आहे.