Maharashtra Drought| राज्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीवरून विरोधकांची सरकारवर जोरदार टीका

राज्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरांच्या छावण्या तातडीने सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करावेत आणि अन्नधान्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय दुष्काळाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला आता अचानक जाग आल्याची टीका केली आहे. अल निनोमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आधीपासूनच असताना सरकारने आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

संबंधित व्हिडीओ