महाराष्ट्र सरकारने राज्यातील कामगार आणि दुकान कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता कारखान्यांमधील कामगारांच्या कामाचे तास ९ वरून १२ तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. तसेच, दुकानांमधील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तासही १० तासांपर्यंत वाढवले आहेत. मात्र, यासाठी कारखान्यांना सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे कामगारांना जास्त आर्थिक लाभ मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.