Mahashivratri 2026 | Hingoli | औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी रिघ, संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा

हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे देशातील आठव्या स्थानी असलेले ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिर आहे.आज महाशिवरात्रीच्या पर्वावर या मंदिरात भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते मध्यरात्रीनंतर दुग्धाभिषेक व महापूजा करण्यात आली.या महापूजेनंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातून महाशिवरात्रीच्या या पर्वावर मोठ्या संख्येने भाविक औंढा नागनाथ नगरीत दाखल झाले आहेत.दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. हर हर महादेव व बम बम बोले चा गजर करत भाविक भक्तीमय वातावरणात दर्शन घेत आहेत. मंदिराचा परिसर देखील आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे.

संबंधित व्हिडीओ