महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला असून, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आता दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ ही खाती सोपवण्यात आली आहेत.