एक महत्त्वाची बातमी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांसंदर्भातली..काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी भगवा दहशतवाद नाहीतर सनातनी दहशतवाद असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली आता त्यांच्या कानशिलात लागवेल त्याला दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय.. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष आरोपी सुधाकर चतुर्वेदींनी हे बक्षीस जाहीर केलंय.. एकूणच चव्हाणांविरोधात हिंदुत्वादी आक्रमक झालेत.. दरम्यान,मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी निर्दोष आरोपी रमेश उपाध्याय यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी हेमंत करकरेंवरी आरोप केलेत... करकरेंनी उपाध्याय यांच्या कुटुंबीयांची बेकायदेशीरित्या चौकशी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय..