मिरा-भाईंदरमधील काशिमीरा परिसरात मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान गंभीर दुर्घटना घडली आहे. मेट्रो ब्रिजखाली उभ्या असलेल्या 23 वर्षीय शादाब नावाच्या तरुणाच्या डोक्यावर वरून सिमेंटचा मोठा ब्लॉक कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी शादाबवर सध्या मिरा रोड येथील वोखहार्ड रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे.शादाब रस्ता ओलांडल्यानंतर फोनवर बोलत उभा असताना हा अपघात घडला.