मुंबईत मनसे कडून "प्रतिपालिका सभागृह" भरवण्यात येणारय. 26 एप्रिलला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचे आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय. याशिवाय भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार त्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांना निमंत्रण आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आलाय. त्यामुळे या प्रतिपालिका सभागृहात विविध विषयांवर यामध्ये चर्चा केली जाणार आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली.. उद्धव ठाकरेंनीही त्याला प्रतिसाद दिला.. मात्र आदित्य ठाकरेंनी यावर बोलणं टाळलंय.. हा निर्णय दोन पक्षप्रमुखांचा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली.. उद्धव ठाकरेंनीही त्याला प्रतिसाद दिला.. मात्र आदित्य ठाकरेंनी यावर बोलणं टाळलंय.. हा निर्णय दोन पक्षप्रमुखांचा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत..